
संगमनेर | तालुका प्रतिनिधी
संगमनेर शहरातील केशवनगर रहाणे मळा येथे सासरच्या त्रासाला कंटाळून शालु सुदर्शन पठाडे वय ( ३५) या विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात पती, सासू, ननंद या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केशवनगर रहाणे मळा येथे ही महिला तीच्या सासरी नांदत होती तीचे पती सुदर्शन राधाकृष्ण पठाडे, सासू मिराबाई राधाकृष्ण पठाडे व ननंद सुषमा सुधाकर पुंड यांनी संगमत करून शालु पठाडे या महिलेस वेळोवेळी तिचेकडील सोन्याचे दागिने व पैसे यांची मागणी करून शारीरिक, मानसिक छळ करत मारहाण केली त्यामुळे वरील लोकांच्या त्रासाला कंटाळून शालु हीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी अनिल निवृत्ती अनाप रा. सात्रळ सोनगाव ता. राहुरी हल्ली रा.मुंबई बोरवली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीसांनी पती, सासू, ननंद या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सातपुते हे करत आहे.