विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

माहेरुन 25 हजार रुपये घेवून येत नाही म्हणून तीस दररोज होणार्‍या शिवीगाळ मारहाण तसेच शारिरीक व मानसिक छळास कटाळून विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील प्रियंका सतिश पवार हिने माहेरुन 25 हजार रुपये आणावेत म्हणून तिस सतिश बापू पवार याने शिवीगाळ करत मारहाण केली होती. दररोज होत असलेल्या शारिरीक व मानसिक छळास कंटाळून प्रियंकाने उक्कलगाव येथील घरात गळफास घेवून आत्महत्या केली. तिला पुढील उचारासाठी लोणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी प्रियंकाची आजी मंगल शाहू गायकवाड (वय-60) यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी तिचा पती सतीष बापू पवार याच्याविरोधात भादंवि कलम 306, 323, 498अ, 504, 506 नुसार श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com