विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी भानसहिवरेच्या पाच जणांवर गुन्हा

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी भानसहिवरेच्या पाच जणांवर गुन्हा

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे विवाहितीने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याप्रकरणी महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरुन सासरच्या पाच जणांवर हुंड्यासाठी छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संदीप प्रकाश शिरसाठ (वय 23) रा. लोहगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, त्यांची बहिण वनिता महेश साबळे (वय 27) ही सासरी नांदत होती. तिचे लग्न 4 ऑगस्ट 2020 रोजी झाले होेती. लग्नानंतर तीन महिन्यापासून सासरी नांदत असताना लग्नात हुनडा दिला नाही. माहेराहून 50 हजार रुपये घेवून ये तसेच घरातील काम येत नाही. तुला त्वचेचा आजार असून तू रोगी आहेस असे म्हणून मारहाण करुन उपाशीपोटी ठेवून छळ केला जात होता.

या फिर्यादीवरुन पती महेश बापू साबळे, सासू अलका बापू साबळे, दिर राजू बापू साबळे, सासरा बापू साबळे व मावस सासू श्रीमती केदारी (नाव माहित नाही) या पाच जणांवर भारतीय दंड विधान कलम 304(ब), 498(अ), 306, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. मोढे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com