सोनेवाडीत विवाहितेची आत्महत्या

सोनेवाडीत विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर (प्रतिनिधी) -

विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू-सासर्‍यासह पतीविरोधात

नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील सोनेवाडी गावामध्ये ही घटना घडली. सोनाली दादा झिटे असे मयत विवाहितेचे नाव आहे. सोनालीचा पती दादा रामा झिटे, सासू इंद्राबाई रामा झिटे, सासरा रामा झिटे (मुळ रा. गिरिम ता. दौंड जि. पुणे, हल्ली रा. सोनवाडी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सोनालीचे वडिल महादू नाथाभाऊ कोकरे (वय 42 रा. बाबुर्डी ता. बारामती जि. पुणे) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनालीवर तिचा पती दादा व सासू-सासरे संशय घेऊन तिला उपाशीपोटी ठेवत होते.

त्यांनी सोनालीला वेळोवेळी मारहाण करून तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. यामुळे सोनालीने आत्महत्या केली. सोनालीला तिचा पती व सासू-सासर्‍याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे महादू कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com