सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पती, सासू, नणंद विरोधात गुन्हा दाखल
सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरातील कामे नीट करीत नाही, स्वयंपाक येत नाही असे म्हणून सासरी मानसिक छळ करण्यात आला. सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेरणा प्रसाद सुराणा (वय 25, रा. भूषणनगर, केडगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

मयत विवाहितेच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रसाद सुराणा, सासू संगिता सुराणा व नणंद अश्विनी भळगट (सर्व रा. भूषणनगर, केडगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेरणा सुराणा हिचे लग्न झाल्यानंतर सहा महिन्यानंतर ते दि. 16 मार्च 2023 पर्यंत सासरी केडगाव येथे नांदत असताना घरातील कामे नीट करीत नाही.

स्वयंपाक येत नाही म्हणून तिला टोचून बोलून तिचा मानसिक छळ करीत होते. त्यांच्या जाचास कंटाळून प्रेरणा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोतवाली पोलिस ठाण्याचे सपोनि पिंगळे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com