
करंजी |प्रतिनिधी| Karanji
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संबंधित विवाहितेच्या वडिलांनी पाथर्डी पोलीसात गुन्हा दाखल केल्यानंतर आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या पतीस पाथर्डी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
या घटनेबाबत आत्महत्या केलेल्या विवाहितेचे वडील बनेमिया जानमहंमद पठाण राहणार बोधेगाव (ता.शेवगाव) यांनी पाथर्डी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांची मुलगी करिष्मा समीर शेख हिला तिचा पती समीर महंमद शेख हा सातत्याने मारहान करुण मानसिक त्रास द्यायचा. त्याच्या व कुटुंबीयाच्या त्रासाला कंटाळून मुलीने करंजी येथे 1 जून रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यामुळे संबंधितांच्या विरोधात पठाण यांनी मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला असुन आरोपी समीर महमंद शेख यास पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अरविंद चव्हाण पुढील तपास करत आहेत.