विवाहितेचा विनयभंग करत जाळून टाकण्याची धमकी

एमआयडीसी हद्दीतील घटना || दोघांविरूध्द गुन्हा
विवाहितेचा विनयभंग करत जाळून टाकण्याची धमकी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विवाहितेचा पाठलाग करत तिच्यासोबत गैरवर्तन करून जिवंत जाळून टाकण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी एमआयडीसी हद्दीत घडली. या प्रकरणी पीडिताने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दीपक हापसे व त्याची आई (पूर्ण नावे माहिती नाही, रा. सनफार्म शाळेजवळ, एमआयडीसी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळी दीपक हापसे याने फिर्यादीचा पाठलाग केला. त्यांना रस्त्यामध्ये थांबवून म्हणाला की,‘तू माझ्याशी बोलत का नाही’, त्यावर फिर्यादी त्याला म्हणाली,‘मला तुझ्याशी बोलायचे नाही’. यानंतर दीपकने फिर्यादीचा हात पकडून जवळ ओढले आणि लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. ‘तू जर माझ्याशी बोलली नाही तर तुला जीवंत जाळून टाकीन’, अशी धमकी दिली. घडलेला प्रकार फिर्यादी यांनी दीपकच्या आईला सांगितला असता त्यांनी शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com