विवाहितेला मारहाण करत विनयभंंग

पिंपळगाव उज्जैनी येथील यात्रेत घडली घटना
विवाहितेला मारहाण करत विनयभंंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यात्रेनिमित्त देव दर्शनासाठी गेलेल्या विवाहितेला मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना पिंपळगाव उज्जैनी (ता. नगर) येथे बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुष्मा गजानन आल्हाट, प्रतिभा रमेश दळवी, रमेश पेत्रस दळवी, प्रेम रमेश दळवी, प्रदीप गजानन आल्हाट (सर्व रा. पिंपळगाव उज्जैनी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी फिर्यादी व त्यांची मुलगी पिंपळगाव उज्जैनी येथे यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी गेल्या असताना आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केले.

रमेश दळवी व प्रेम दळवी यांनी फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. प्रेम दळवी याने फिर्यादी यांच्या मुलीला मारहाण करून तिच्याकडील मोबाईल काढून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.