विवाहितेचा घरात घुसून विनयभंग

तरूणाविरूध्द पोलिसांत गुन्हा
विवाहितेचा घरात घुसून विनयभंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विवाहितेचा (Married Woman) तरूणाने घरात घुसून विनयभंग (Molested) केला. अहमदनगर शहरात (Ahmednagar City) ही घटना घडली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल ( Filed a crime) करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. वसीम (पूर्ण नाव माहिती नाही, मुळ रा. जेऊर ता. नगर) असे गुन्हा दाखल ( Filed a crime) झालेल्या तरूणाचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली.

फिर्यादी व वसीम हे दोघे अहमदनगर शहरात (Ahmednagar) शेजारी शेजारी भाडेकरू म्हणून राहतात. शनिवारी रात्री फिर्यादी यांचे पती घरी नसताना वसीम याने फिर्यादीला शिवीगाळ केले. बळजबरीने त्यांच्या घरात घुसून गैरवर्तन करून विनयभंग केला. झालेला प्रकार फिर्यादीने पतीला सांगितला असता त्यांनी वसीमला फोन केला असता त्याने शिवीगाळ करत,‘नालेगावमध्ये ये तूला जीवे मारून टाकतो,’ अशी धमकी (Threat) दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com