
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सोशल मीडियावर ओळख झालेल्या विवाहितेला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. नगर शहरात राहणार्या पीडित विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय हम्मा चव्हाण (रा. शिर्सुफळ ता. बारामती, जि. पुणे) याच्याविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीची इंस्टाग्रामवरून अक्षय हम्मा चव्हाण यांच्यासोबत ओळख झाली होती. त्याने पोल्ट्री फार्म व डाळिंबांचा बाग असल्याचे फिर्यादीला सांगितले होते. ते दोघे फोनवर बोलत होते. तेव्हा तो फिर्यादीला,‘आपण दोघे सोबत राहू व तु तुझ्या नवर्यासोबत राहू नको, आपण दोघे लग्न करू’, असे म्हणत असे. 6 मार्च रोजी अक्षय माळीवाडा बस स्थानकावर आला व त्याने फिर्यादीला भेटण्यासाठी बोलावले.
फिर्यादी तेथे गेल्यानंतर त्याने तिला शिर्सुफळ येथील पोल्ट्री फार्मवर नेले. तेथील एका खोलीवर नेऊन फिर्यादीसोबत बळजबरीने शारीरीक संबंध केले व ‘तु जर माझे विरूध्द पोलीस स्टेशनला तक्रार केली व आरडाओरडा केला तर तुला तुझ्या घरच्यांना गोळ्या घालून जिवे मारीन’, अशी धमकी दिली. दरम्यान फिर्यादीने तेथून सुटका करून तिच्या वडिलांना संपर्क केला. यानंतर नगर गाठून अक्षय हम्मा चव्हाण विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अत्याचारा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.