विवाहितेचा विनयभंग, सासरच्या लोकांवर गुन्हा

नगर शहरातील घटना
विवाहितेचा विनयभंग, सासरच्या लोकांवर गुन्हा
Crime news

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सासरच्या लोकांनी विवाहितेला मारहाण (Woman Beating) केली. तसेच दीराने विनयभंग (Molestation) केेला असल्याची फिर्याद विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) सासू-सासरे व दीराविरूद्ध भादंवि 354, 354 (ब), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नगर शहरातील (Nagar City) एका उपनगरात 20 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

20 नोव्हेंबर रोजी सकाळी फिर्यादी घरामध्ये असताना त्यांचे सासरे लहान मुलाला रागवत असल्याने फिर्यादी त्यांना समजून सांगण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केले. फिर्यादी त्यांना समजून सांगण्यासाठी गेल्या असता आरोपी त्यांच्या अंगावर धावून आले. त्यांनी फिर्यादीचे कपडे फाडून विनयभंग (Molestation) केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक नितीन शिंदे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com