माहेरुन 30 लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ

राहुरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल
माहेरुन 30 लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

गाडी व फ्लॅटचे हप्ते भरण्यासाठी माहेरहून 30 लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला असून याबाबत सासरच्या सहा लोकांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाग्यश्री अक्षय कसोटे (वय 30) रा. हडपसर (पुणे) या महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, सासरी नांदत असताना तुझ्या वडिलांनी लग्नात चांगले जेवण केले नाही. तुला इंग्लिश बोलता येत नाही. तुला घरात स्वच्छता ठेवता येत नाही. असे म्हणून त्या आजारी असताना त्यांना उपाशीपोटी ठेवले. गाडीचे व फ्लॅटचे हप्ते भरण्यासाठी 30 लाख रुपये तुझ्या आई-वडिलांकडून घेऊन ये, अशी मागणी करून वारंवार शारीरिक मानसिक त्रास देऊन छळ केला. तसेच भाग्यश्री व तिच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी केली.

या फिर्यादीवरून पती अक्षय जयवंत कसोटे, सासरा जयवंत विनोद कसोटे, सासू संगीता जयवंत कसोटे, दीर आकाश जयवंत कसोटे, सर्व रा. हडपसर (पुणे) तसेच अनिल साळवे, विजया अनिल साळवे दोघे रा. दापोली जि. पुणे. या सहा जणांवर गुन्हा रजि. नं. 1098/2022 भादंवि कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार साईनाथ टेमकर करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com