पैशासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चौघांविरूध्द गुन्हा

पैशासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चौघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नोकरी करत नसल्याने तसेच माहेरून पैसे आणत नसल्याने विवाहितेला मारहाण करत छळ केल्याची घटना नगर शहरात घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाली सचिन दारकुंडे (वय 26 रा. राजमाता कॉलनी, गुलमोहर रोड, अहमदनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये फिर्यादीचा पती सचिन छबुराव दारकुंडे, सासरे छबुराव गंगाधर दारकुंडे, सासू छाया छबुराव दारकुंडे आणि नणंद कोमल विजेंद्रसिंह उसारे यांचा समावेश आहे.

आरोपी फिर्यादी सोनाली दारकुंडे यांना नोकरीला जा, असे म्हणत होते. त्यास नकार दिला असता फिर्यादीला मारहाण करण्यात आली. तसेच त्यानंतर माहेरवरून पैसे घेऊन ये, असे म्हणत शारिरिक व मानसिक छळ केला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला मारहाण, शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देऊन घरातून हाकलून दिले. तोफखाना पोलिसांत सोनाली दारकुंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

No stories found.