माहेरून दोन लाख न आणल्याने विवाहितेचा छळ

पतीसह 10 जणांविरूध्द भिंगार पोलिसांत गुन्हा
माहेरून दोन लाख न आणल्याने विवाहितेचा छळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये न आणल्याने विवाहितेला मारहाण करून छळ केल्याची घटना समोर आली आहे. पीडित विवाहित महिलेने याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती सचिन जगन्नाथ तांदळे, आशाबाई जगन्नाथ तांदळे, जगन्नाथ बाळू तांदळे, संदीप जगन्नाथ तांदळे, प्रमिला संदीप तांदळे, सागर जगन्नाथ तांदळे (सर्व रा. कानडे मळा, सारसनगर), गयाबाई वसंत गिते, रामजी वसंत गिते (दोघे रा. डोगरवाडी, शिराळ चिचोंडी ता. नगर), अजिनाथ वसंत गिते (रा. चिपाडे मळा, सारसनगर), गया संतोष गिते (रा. औसरकरमळा, फर्‍याबाग, सारसनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 1 नोव्हेंबर, 2018 पासून फिर्यादी विवाहितेचा छळ सुरू असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आरोपींनी विवाहितेला माहेरून दोन लाख रुपये आणण्यास सांगितले. विवाहितेने दोन लाख रुपये आणले नाही म्हणून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. उपाशीपोटी ठेऊन शारिरीक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यासंदर्भात फिर्यादी यांनी सुरूवातीला भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती. तेथे समझोता न झाल्याने भरोसा सेलच्या पत्रानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com