50 लाखांसाठी विवाहितेचा छळ

पतीसह सात जणांविरूध्द गुन्हा
50 लाखांसाठी विवाहितेचा छळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

व्यवसायासाठी माहेरून 50 लाख रूपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ (Married Woman Harassment) केल्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) पतीसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.

आरोपीमध्ये विवाहितेचा पती अजय अशोक मुथीयान, सासु अलका अशोक मुथीयान (रा. कराचीवालानगर, अहमदनगर), नंनद शितल दीपक कुंकुलोळ (रा. कळंब जि. उस्मानाबाद), चुलत सासरे संपत रोकडचंद मुथीयान, चुलत दीर अतुल संपत मुथीयान, चुलत दीर राहुल संपत मुथीयान (रा. टिळक रोड, अहमदनगर) व एक अल्पवयीन मुलगा यांचा समावेश आहे. फिर्यादी यांचे 4 जुलै, 2006 रोजी अजय मुथीयान यांच्यासोबत विवाह झाला आहे. विवाहानंतर 15 दिवसांपासून 4 मे, 2022 पर्यंत वेळोवेळी आरोपींनी व्यवसायासाठी माहेरून 50 लाख रूपये आणावेत म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करत शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादी यांनी सुरूवातीला भरोसा सेल येथे तक्रार दाखल केली होती. तेथे समेट न झाल्याने भरोसा सेलने तोफखाना पोलिसांना (Topkhana Police) दिलेल्या पत्रानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.