10 लाखांसाठी विवाहितेचा छळ

पतीसह पाच जणांविरूध्द पोलिसांत गुन्हा
10 लाखांसाठी विवाहितेचा छळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घर बांधण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नगर तालुक्यातील एका गावातील पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती देवीदास पांडुरंग राठोड, सासू यशोदा पांडुरंग राठोड, सासरा पांडुरंग राठोड, दीर मुकिंद पांडुरंग राठोड, नणंद वैशाली संजय पवार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचा विवाह हा देवीदास राठोड (रा.लक्ष्मीआई तांडा, नाळवंडी, जि.बीड) याच्यासोबत झालेला होता.

विवाहानंतर काही दिवसांतच 25 जुलै 2021 पासून तिच्याकडे सासरच्या मंडळींनी घर बांधणीसाठी माहेरहून 10 लाख रुपये आणावेत, असा तगादा लावला. तिने पैसे आणले नाहीत म्हणून तिला वारंवार उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ व मारहाण केली. या छळाला कंटाळून ती माहेरी आली. त्यानंतर तिने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com