सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर (प्रतिनिधी)

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये शुक्रवारी ही घटना घडली. रोहिणी प्रशांत बुऱ्हाडे (वय 27) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

रवींद्र भिमाशंकर डहाळे (रा. शेवगाव) यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह प्रशांत संतोष बुऱ्हाडे (रा. गुलमोहर रस्ता, सावेडी) यांच्याशी झाला होता.

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

विवाहानंतर काही महिन्यांनी रोहिणीचा विविध कारणांसाठी छळ सुरू केला. या छळाला कंटाळून रोहिणी हिने शुक्रवारी गुलमोहर रस्त्यावरील राहत्या घरात आत्महत्या केली.

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
'या' ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट

रवींद्र डहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात प्रशांत डहाळे (पती), संतोष (सासरा) आणि सुनिता (सासू) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
बँकेचे कामे उरकून घ्या! कारण जानेवारीमध्ये...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com