महिलेला केले ब्लॅकमेल; गुन्हा दाखल

महिलेला केले ब्लॅकमेल; गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी (Savedi) उपनगरात राहणार्‍या एका विवाहीत महिलेला (Married Woman) तिचा अश्लिल व्हिडीओ असल्याचे सांगून ब्लॅकमेल (Blackmail) करणार्‍या मयुर मतकर आणि अक्षय हरीभाउ तागड यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, तिच्या पतीच्या व वडीलांच्या दुकानात काम करणार्‍या मयुर मतकर व अक्षय तागड यांनीच हा सारा प्रकार घडवुन आणला आहे.

महिलेला केले ब्लॅकमेल; गुन्हा दाखल
महिलांनी मनपाच्या दारात फोडले माठ

घरच्याच दुकानात ते काम करीत असल्यामुळे त्यांच्याशी ओळख होती. त्याचा गैरफायदा घेवुन आणि मला जिवे मारण्याची धमकी (Threat) देवुन व्हिडीओ कॉल केला व कपडे काढण्यास सांगितले. याचे रेकार्डींग त्यांनी करुन घेतले. याच रेकॉर्डींगचा वापर करुन माझ्याकडे 4 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतरही अनेक वेळा फोन करुन व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

महिलेला केले ब्लॅकमेल; गुन्हा दाखल
जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाची निवड 8 मार्चला
महिलेला केले ब्लॅकमेल; गुन्हा दाखल
पासपोर्टची साक्षांकित झेरॉक्स द्या, परवानगीशिवाय नगर सोडू नका
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com