
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
बहिण व तिच्या सासुचे भांडण सोडविण्यास गेलेल्या विवाहितेस लाथाबुक्क्यांनी शिवीगाळ (Married Woman Beating) व मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी (Threat) दिल्याप्रकरणी बहिणीची सासू व सासर्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. हरेगाव डी क्वार्टर येथील दिपाली नामदेव बावस्कर (वय 22) या महिलेने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवार दि. 23 मे रोजी सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास हरेगाव डी क्वार्टर येथे माहझ बहिण व तिच्या सासूचे भांडण सोडविण्यासाठी आपण गेलो असता बहिणीची सासू आरती रमेश शेळके व सासरा रमेश नाना शेळके या दोघांनी शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) केली तसेच जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली.
या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात आरती रमेश शेळके व रमेश नाना शेळके यांच्याविरुद्ध भादंवि कलम 323, 504,507 नुसार गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. अधिक तपास तालुका पोलीस करीत आहेत.