
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
न्यायालयातील तारखेचे काम आटोपून वडिलांच्या घरी जात असलेल्या विवाहितेला (Married Woman) तिच्या सासरच्या मंडळी सह अन्य तिघांनी रस्त्यात अडवून मारहाण (Beating) करून जीप मधून पळवुन नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी तालुक्यातील धांदरफळ (Dhandarphal) जवळील डेरे फाटा परिसरात घडली. पोलिसांनी याप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, राजेंद्र वाकचौरे (रा. धांदळफळ बुद्रुक) यांची मुलगी व तिचा नवरा शुभम आनंदा कोल्हे (रा. कोल्हेवाडी) यांच्यात वाद आहे. याबाबत त्याच्या पत्नीने न्यायालयात (Court) दावा दाखल केला आहे. शनिवार दि. 21 रोजी राजेंद्र वाकचौरे हे मुलगी हीस कोर्टात घेऊन गेले होते. कोर्टातील काम संपल्यानंतर वाकचौरे हे आपली मुलगी हिच्या सोबत मोटार सायकलवर वरून घरी जात असताना सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास डेरेवाडी फाटा येथे शुभम आनंदा कोल्हे, ऋत्विक आनंदा कोल्हे, आनंदा महादू कोल्हे, आनंदा महादू कोल्हे यांची पत्नी व इतर तीन (सर्व रा. कोल्हेवाडी ता. संगमनेर) यांनी राजेंद्र वाकचौरे यांना रस्त्यात अडवून लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) केली. आरोपींनी फिर्यादीची मुलगी पूजा हीस बोलोरो जीपमध्ये बसवून पळवुन नेले.
याबाबत राजेंद्र वाकचौरे यांनी तालुका पोलीस ठाण्यात (Police Station) फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी विवाहितेच्या नवरा, दीर, सासू-सासरे आणि इतर तीन अशा सात जणांवर गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करत आहे.