विवाहितेला मारहाण करत छळ

पतीसह पाच जणांविरूध्द पोलिसांत गुन्हा
विवाहितेला मारहाण करत छळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विवाहितेला मारहाण करत छळ करणार्‍या पतीसह पाच जणांविरूध्द येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहेरे (ता. नगर) येथील 27 वर्षीय पीडित विवाहितेने याप्रकरणी 17 ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली आहे.

पती कमलेशकुमार रमनभाई सोलंकी, कल्पना संजय सोलंकी, गौरी रमनभाई सोलंकी, सरजु रमनभाई सोलंकी, खुशबु सरजु सोलंकी (सर्व रा. पंचवटी हरिजन निवार, पावर हाऊस गोधरा, ता. गोधरा, जि. वडोदरा, गुजरात) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. डिसेंबर 2016 ते 10 मार्च, 2022 दरम्यान ही घटना घडली आहे. देहेरे येथील 27 वर्षीय तरुणीचा विवाह गोधरा (गुजरात) येथील कमलेशकुमार सोबत झाला आहे.

विवाहानंतर डिसेंबर 2016 पासून पती कमलेशकुमार व सासरकडील इतरांनी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरूवात केली. या संशयावरून विवाहितेला वेळोवेळी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिला उपाशीपोटी ठेवले. शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार डी.बी.पवार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com