विवाहितेसह माहेरच्यांना मारहाण

सावेडीतील घटना || पतीसह तिघांवर गुन्हा
विवाहितेसह माहेरच्यांना मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विवाहितेसह तिच्या आई- वडिल व बहिणीला सासरच्यांनी शिवीगाळ करत मारहाण (Beating) केल्याची घटना बुधवारी (दि.24) सायंकाळी सावेडी (Savedi) उपनगरातील एकविरा चौक परिसरात घडली. या प्रकरणी पीडित विवाहिता नेहा श्रीकांत गव्हाणे (वय 21 रा. एकविरा चौक, सावेडी) यांनी गुरूवारी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) फिर्याद दिली आहे.

विवाहितेसह माहेरच्यांना मारहाण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची दुटप्पी भूमिका

दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादीचा पती श्रीकांत रवींद्र गव्हाणे, सासू आरती रवींद्र गव्हाणे, नंदवे जगदिश शिवाजी उगले (सर्व रा. एकविरा चौक, सावेडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. फिर्यादीच्या वडिलांचा वाढदिवस असल्याने त्या माहेरी गेल्या होत्या. त्या बुधवारी सायंकाळी घरी (सासरी) आल्या असता पती, सासू व नंदवे यांनी त्यांना शिवीगाळ करून,‘तु आमच्या घरी कशाला आलीस, तुला येथे राहायचे असेल तर तुझ्या आई- वडिलांना बोलावून घे’, असे म्हणून जगदिश उगले याने लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केली.

विवाहितेसह माहेरच्यांना मारहाण
थकबाकीचा 4 था हफ्ता जूनच्या पगारासोबत..!

फिर्यादीने आई- वडिलांना बोलावून घेतले असता पती श्रीकांत, सासू आरती, नंदवे जगदिश यांनी फिर्यादी, त्यांची बहिण व आई- वडिलांना मारहाण (Beating) करून जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

विवाहितेसह माहेरच्यांना मारहाण
सरकारी जागेवरील अतिक्रमण सरपंचास भोवले
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com