विवाहित अल्पवयीन मुलीचा गर्भपात

सावेडीतील घटना || पतीसह सहा जणांविरूध्द गुन्हा
विवाहित अल्पवयीन मुलीचा गर्भपात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी आई, वडिल, सासू-सासरे, पती, दीर यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर हा प्रकार समोर आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जे.सी.मुजावर यांनी फिर्याद दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न सावेडी उपनगरातील एका मुलासोबत लावून देण्यात आले होते. लग्नानंतर पीडित मुलीला गर्भधारणा झाली. 4 सप्टेंबर रोजी दुपारी तिच्या पोटात अचानक त्रास होऊ लागल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित मुलीचा गर्भपात झाला असल्याचा प्रकार समोर आला. याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक निरीक्षक मुजावर यांनी पथकासह रुग्णालयात भेट देऊन पीडित अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदविला.

दरम्यान पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिचा पतीसोबत मुलीची आई, वडिल, सासू-सासरे, दीर यांनी विवाह लावून दिला. पीडिता अल्पवयीन अल्याचे माहिती असून देखील पतीने संबंध ठेवून तिला गर्भवती केले. यामुळे निरीक्षक मुजावर यांच्या फिर्यादीवरून वरील सहा जणांविरूध्द बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 चे कलम 10 व 11 तसेच बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 चे कलम चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com