सासरच्या छळाला कंटाळून विवाहित पुरूषाची आत्महत्या

पाच जणांविरूध्द गुन्हा; पैशासाठी सुरू होता छळ
सासरच्या छळाला कंटाळून विवाहित पुरूषाची आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लग्नात ठरलेले पैसे दिले नाही म्हणून सासरच्या लोकांनी पुरूषाचा छळ केला. त्यांच्या त्रासाला कंटाळून पुरूषाने विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केली. धनेश कदम चव्हाण (रा. भवानीनगर, मार्केटयार्डमागे, नगर) असे आत्महत्या केलेल्या पुरूषाचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगीता कदम चव्हाण (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. धनेशचा सासरा कुकलाल मोतिलाल काळे, सासू शैला कुकलाल काळे, पत्नी पुजा धनेश चव्हाण, मेव्हाणा राहुल कुकलाल काळे व निलेश कुकलाल काळे (सर्व रा. मोरवाडी, कोळगाव ता. श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी यांचा मुलगा धनेशचा विवाह कुकलाल काळे यांची मुलगी पुजा सोबत 24 ऑगस्ट, 2021 रोजी झाला होता.

विवाह करते वेळी धनेशच्या घरच्यांनी मुलगी पुजाच्या वडिलांना एक लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. लग्नाच्या दिवशी 50 हजार रुपये रोख दिले होते व बाकी रक्कम नंतर देण्याचे ठरले होते. लग्नात ठरलेले 50 हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी धनेशचा त्याच्या पत्नीसह सासरच्या लोकांकडून वेळोवेळी छळ सुरू होता. या त्रासाला कंटाळून धनेशने 1 ऑक्टोबर, 2021 रोजी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली होती.

दरम्यान मयत धनेश याच्या मृत्यूचा व्हीसेरा नाशिक येथील प्रयोगशाळेतून एक वषार्र्ंनी प्राप्त झाला. यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com