प्रेमीयुगलाची गळफास घेत आत्महत्या

पारनेर तालुक्यातील सावताळच्या जंगलात घटना
प्रेमीयुगलाची गळफास घेत आत्महत्या

पारनेर |प्रतिनिधी| Parner

विवाहीत प्रेमी युगुलांनी गळफास (Married lovers Suicide) घेत जीवन यात्रा संपाविल्याची घटना रविवारी (दि.3) सायंकाळी पारनेर तालुक्यातील (Parner Taluka) वडगाव सावताळ (Vadgav Savtal) येथील जंगलात घडली आहे. ही आत्महत्या (Suicide) की घातपात अशी चर्चा असून यामुळे परिसरात भिती व्यक्त होत आहे .

राजेंद्र कोंडीभाऊ केदार (30, रा. मांडओहळ खडकवाडी ता .पारनेर) व नानुबाई पोपट चिकणे (27, रा . मेनडोह पळशी ता .पारनेर) अशी आत्महत्या (Suicide) करणार्‍या प्रेमीयुगलांची नावे आहेत. घटनेची माहिती समजताच पारनेर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ (Assistant Inspector of Police Pramod Wagh), पोलीस हेड कॉन्स्टेबल लोणारे हे सहकार्‍यांसमवेत घटनास्थळी पोहोचले दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी टाकळी ढोकेश्वर (Takali Dhokeshwar) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

यातील दोन्ही मयत हे विवाहित असून संसारी आहेत राजेंद्र केदार यांना पत्नी आणि एक मुलगी आहे तर नानुबाई या विवाहित असूनही दोघांचे गेले वर्षभरापासून प्रेम संबंध होते. वर्षभरापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता नातेवाईकांच्या मध्यस्थीने तो वाद (Dispute) मिटला गेला आणि दोघेही एकत्र राहू लागले होतो. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही.

जंगल ठरतय गुन्हेगारांचे आश्रयस्थान

वडगाव सावताळ येथे मोठ्या प्रमाणावर जंगली भाग आहे निर्जन वस्ती असल्याने त्या ठिकाणी अनेक प्रकारचे गुन्हेगारीच्या घटना घडलेल्या आहेत . या परिसरामध्ये अनेक आंबटशौकीन लोक मौजमजा करण्यासाठी येत असतात यातूनच गेले वर्षभरापूर्वी एक खूनाची घटना घडली होती. कॉलेजच्या तरुण आणि तरुणी या जंगलामध्ये फिरण्यासाठी जातात यातूनच अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com