लग्न समारंभात चोरी करणारा जेरबंद

तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत || तालुका पोलिसांची कामगिरी
लग्न समारंभात चोरी करणारा जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लग्न समारंभातून फोटोग्राफरचा कॅमेरा, लेन्स चोरून नेणार्‍या सराईत गुन्हेगाराला नगर तालुका पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेत अटक केली आहे. संदीप धर्मा पवार (रा. भोसरी, जि. पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला एक लाख 18 हजाराचा कॅमेरा, एक लाख 65 हजाराची कॅमेर्‍याची लेन्स असा दोन लाख 89 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोहेल मुस्ताफा मनियार (रा. चिंचोडी पाटील ता. नगर) यांना भातोडी (ता. नगर) गावात लग्न समारंभाची ऑर्डर होती. ते लग्न समारंभात असताना तेथून त्यांचा कॅमेरा, लेन्स व इतर साहित्य चोरीला गेले होते.

त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर चोरी बाबत पोलिसांनी माहिती काढून संदीप धर्मा पवार याला भोसरी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेत अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द भोसरी एमआयडीसी, पुणे एमआयडीसी पोलीस ठाणे, चिखली या पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखली सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग, अंमलदार शैलेश सरोदे, आनंद घोडके, गायत्री धनवडे, संदीप जाधव, विशाल टकले, ज्ञानेश्वर खिळे यांच्या पथकाने केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com