अल्पवयीन मुलीचे लग्न; आईसह पती, सासर्‍यावर गुन्हा

कोतवाली पोलीस ठाण्यात पीडित मुलीची फिर्याद
अल्पवयीन मुलीचे लग्न; आईसह पती, सासर्‍यावर गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahemdnagar

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात मुलीची आई, पती व सासर्‍या विरोधात अत्याचार, पोक्सो, बालविवाह प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीने फिर्याद दिली आहे.

नगर शहरात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीचे लग्न तीन वर्षापूर्वी तिच्या आईने नात्यातीलच एका मुलासोबत लावून दिले. त्यावेळी त्या मुलीचे वय 14 वर्षे होते. तिचा या लग्नाला विरोध होता. मुलीची इच्छा नसतानाही पतीने तिच्यासोबत वेळोवेळी शरिरसंबंध ठेवले. पतीला जुगाराचा नाद असल्याने तो जुगारात पैसे हरल्यानंतर मला घरी येऊन त्रास देत, माझ्या आईला मारून टाकायची धमकी देत असल्याचे, पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे.

पिडीत अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने तिला महापालिकेच्या रूग्णालयात दाखल केले. तिने एका मुलीला जन्म दिला. यानंतर पीडित मुलगी आईच्या घरी वास्तव्यास गेली असता तिचा पती तिला तेथे येऊन त्रास देत होता. यानंतर त्यांनी चाईल्ड लाईनची मदत घेत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.