अल्पवयीन मुलीचा विवाह, पाच जणांवर गुन्हा

पोलीस झाले फिर्यादी
अल्पवयीन मुलीचा विवाह, पाच जणांवर गुन्हा
file photo

अहमदनगर|Ahmedagar -

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी मुलीच्या आई- वडिलासह पती व सासू- सासर्‍याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांनी फिर्याद दाखल केली आहे. अत्याचार, पोक्सो, बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यात ही घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, नगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह मे 2020 मध्ये तालुक्यातील एका मुलासोबत लावून देण्यात आला. मुलगी अल्पवयीन असतानाही आई-वडिलांनी विवाह लावून दिला. तर मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या पतीने तिच्याशी संबंध ठेवले.

यातून ती मुलगी गर्भवती राहिली. मुलीला रूग्णालयात दाखल केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. मुलीची प्रसृती झाली असून पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला आहे. या जबाबावरून उपनिरीक्षक कणसे यांनी फिर्याद दाखल केली आहे. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पुढील तपास करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com