लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

चाळीस वर्षीय ऊसतोड करून मजुरी करणार्‍या विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍या गोरख बापु मिरड रा. मिरडवाडी ता. आष्टी जि. बीड याच्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी उदरनिर्वाहासाठी उसतोडणीचे काम केले होते. त्यावेळी ऊस तोडणीच्या टोळीत गोरख बापु मिरड हा ट्रॅक्टर ड्रायव्हर याच्या बरोबर चांगली ओळख झाली. मिरड म्हणाला की,माझी पत्नी मला सोडुन गेलेली आहे व तुझे पण पती मयत झालेले आहेत आपण दोघे लग्न करु.मैत्री होवुन त्याचे रुपांतर प्रेमसंबधात झाले. 17 ऑक्टोबर 2022 रोजी मिरड याने महिलेला आपण दोघे लग्न करु असे म्हणुन महिलेला बळजबरीने मोटार सायकलवर बसवले.

डोंगरगण (ता.आष्टी) येथे नेऊन महिलेवर अत्याचार केला. महिनाभरानंतर दोघात वाद होवुन गोरख मिरड याने महिलेला मारहाण केली. महिलेने सरकारी हॉस्पिटला उपचार केले.त्यावेळी तेथील डॉक्टरांनी दिवस गेले असल्याबाबत महिलेला सांगितले. त्यानंतर गोरख मिरड हा महिलेला म्हणाला की, बाळ पाडुन टाक नाही तर तुला जीवे मारुन टाकीन अशी धमकी देवून शिवीगाळ केली.पाथर्डी पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com