लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा जरेबंद

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा जरेबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार करणारा 6 महिन्यांपासून फरार आरोपीला कोतवाली पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजू उर्फ खुदाबक्ष मुस्ताक शेख (रा. सर्जेपुरा, नगर) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीस न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

मार्च 2023 मध्ये पिडीत महिला यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, 2019 ते फेबु्रवारी 2023 या दरम्यान आरोपी नामे राजू उर्फ खुदाबक्ष मुस्ताक शेख याने पिडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या बरोबर वेळोवेळी शाररिक संबंध प्रस्थापित केले. तसेच फिर्यादीने त्याला लग्नबाबत विचारले असता त्याने तु परत लग्नाचा विषय काढायचा नाही असे म्हणुन फिर्यादीस शिवीगाळ करुन मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. मात्र, तो म्युनसिपल कॉलनी, नालेगाव अहमदनगर येथे येणार असल्याची माहिती कोतवाली पोलीसांना त्यानूसार पोलीसांनी कारवाई करून त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीस न्यायालयात उभे केले असता 5 दिवसांची कोठडी मिळाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com