बाजारपेठेत प्लास्टिक कॅरीबॅग जप्त

मनपा, प्रदूषण महामंडळाची कारवाई
बाजारपेठेत प्लास्टिक कॅरीबॅग जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्लास्टिक कॅरीबॅगवर बंदी असतानाही बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर केला जात आहे. वारंवार कारवाई करून देखील व्यापारी, दुकानदार, हातगाडीवाले यांच्याकडून प्लास्टिक कॅरीबॅग वापरली जात आहे. काल पुन्हा मनपा व प्रदूषण महामंडळाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी बाजारपेठेत कारवाई केली.

व्यापारी दुकानदार व हातगाडीवाले कॅरीबॅगचा मोठ्या प्रमाणात वापर करत असून कापड बाजार येथे त्यांच्यावर सोमवारी कारवाई करून प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केली. या कारवाईत महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रशांत रामदिन, टी.एन. भांगरे, बाळासाहेब विधाते, सुरेश वाघ, भरत सारवान, ऋषिकेश भालेराव, ऋषिकेश वाल्मीक, संदीप चव्हाण, आर.बी.सामल, प्रदूषण महामंडळाचे रविराज पाटील, प्रमोद डोके सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com