बाजार समितीच्या प्रलंबित प्रश्नांची आढावा बैठकीत चर्चा

बाजार समितीच्या प्रलंबित प्रश्नांची आढावा बैठकीत चर्चा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने मंगळवारी जिल्ह्यातील सर्व बाजार समितींच्या सभापती व सचिवांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिक विभागीय पणन महामंडळाचे उपव्यवस्थापक चंद्रशेखर बारी, राहुरी बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे, पारनेर बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, प्रशासक डी. ए. घोडेचोर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध बाजार समितींचे सभापती व सचिवांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती.

या बैठकीत बाजार समितींच्या अनेक प्रश्नांची उहापोह झाली. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती करोना काळात संकटात सापडल्या आहेत. बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आढावा बैठक उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सांगितले.

सभापती प्रशांत गायकवाड म्हणाले, बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रथमच आढावा बैठक उपनिबंधक कार्यालयाने घेतली. करोना काळात सर्व बाजार समितींच्या कर्मचार्‍यांनी स्वत:च्या जीवाचा विचार न करता शेतकर्‍यांचे मालाचा लिलाव केल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

त्यामुळे बाजार समितींच्या सर्व कर्मचार्‍यांना फ्रंटलाईन करोना वॉरियर म्हणून घोषित करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Related Stories

No stories found.