बाजार समितीचे उपसभापती पाचपुते यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल

ठरावावर 18 पैकी 12 संचालकांच्या सह्या
बाजार समितीचे उपसभापती पाचपुते यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधी|Shrigonda

श्रीगोंदा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती धनसिंग भोइटे यांनी आपल्या सभापतिपदाचा राजीनामा दिला होता. ज्यावेळी ते सभापती झाले आणि लगेच त्यांच्या सह्यांचे अधिकार काढले होते. सह्यांचे अधिकार उपसभापती वैभव पाचपुते यांच्याकडे होते. मात्र आता 18 पैकी 12 संचालकांनी उपसभापतींच्या विरोधात मनमानी आणि इतर संचालकांना विश्वासात घेत नसल्याचे कारण देत जिल्हाधिकार्‍यांकडे संचालक संजयराव जामदार यांच्या नेतृत्वाखाली अविश्वास ठराव दाखल केला.

24 ऑक्टोंबर 2016 रोजी श्रीगोंदा तालुका कृषिउत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती. निवडणुकीत जगताप, नाागवडे गटाचे 10 संचालक निवडून आले तर भाजपच्या आमदार बबनराव पाचपुते गटाचे आठ संचालक निवडून आले. काही दिवसांत सभापती धनसिंग भोइटे यांचे सह्यांसह सर्व अधिकार काढून घेत नाममात्र सभापती ठेवले होते.

उपसभापती वैभव पाचपुते यांनी सगळा कारभार हातात घेतला. आता बाजार समितीचे माजी उपसभापती आणि विद्यमान संचालक संजय जामदार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 14 रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे उपसभापती वैभव पाचपुते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. यावर 12 संचालकांच्या सह्या असून पाचपुते हे मनमानी पद्धतीने काम करत असून संचालकांना विश्वासात घेत नसल्याचे त्यात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com