श्रीरामपूर : बाजार समितीच्या बाहेर पहाटे गर्दीच गर्दी

श्रीरामपूर : बाजार समितीच्या बाहेर पहाटे गर्दीच गर्दी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

काल कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडते यांनी प्रांताधिकार्‍यांना निवेदन देवून भाजीपाला मार्केट बंद ठेवण्याचे आवाहन केले.

मात्र पणनची परवानगी नसल्यामुळे बंद ठेवता येणार नाही असे सभापती शिंदे यांनी सांगितल्यावर काल पहाटे शेतकर्‍यांमध्ये गोंधळ उडाला होता. काल पहाटेच शेतकरी बाजार समितीच्या बाहेर जमले होते. या ठिकाणी गर्दीच गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला तर अनेकांच्या तोंडाला मास्कच नव्हते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होवू नये म्हणजे बाजार समितीच्या आडत्यांनी भाजीपाला बाजार बंद ठेवण्याचे आवाहन देवून प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले होते. मात्र आडते व बाजार समितीच्या वेगवेगळ्या आवाहनामुळे शेतकरी गोंधळात पडले होते. बाजार समितीवर शेतकरी आले अणि त्या पाठोपाठ ग्राहकही मोठ्या प्रमाणावर जमले होते. या ठिकाणी प्रांतांना निवेदन देणारे काही आडतेही उपस्थित होते. शेतकरी तसेच भाजीपाला विके्रते यांनी काल रस्त्यावरच गर्दी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लघंन दिसले.

यावेळी बाजार समितीचे दोनच कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. ते म्हणाले एवढी मोठी गर्दी आवरणे आमच्या दोघांना शक्य नाही. लोकांचा रोष घेणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही आमच्या वरिष्ठांना कळविले असल्याचे त्यांनी सांगितले. भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनीही खूपच गर्दी केली होती. काल पहाटेच शेतकरी बाजार समितीच्या बाहेर जमले होते. या ठिकाणी गर्दीच गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला तर अनेकांच्या तोंडाला मास्कच नव्हते. यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला काळे फासल्याचे दिसून आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com