दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

घोडेगावच्या सात जणांविरूध्द गुन्हा
दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

व्यवसायासाठी आई-वडिलांकडून दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विवाहितेचा पती मोहसीन सुलेमान शेख, दीर नासीर सुलेमान शेख, जाव अंजुम नासीर शेख (सर्व रा. घोडेगाव ता. नेवासा), नंनद रिजवान अख्तर शेख, तिचा पती अख्तर हानिफ शेख (दोघे रा. मोमीनगल्ली, भिंगार), नंनद रेश्मा आझाद खान, तिचा पती आझाद शेर खान (दोघे रा. देवगाव ता. नगर) यांचा समावेश आहे. फिर्यादी यांचा विवाह 9 मे, 2010 रोजी घोडेगाव येथील मोहसीन शेख यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर फिर्यादी यांना दोन ते तीन महिने सासरच्या लोकांनी व्यवस्थित नांदविले. त्यानंतर लग्नातील मानपान, हुंडा दिला नाही या कारणातून छळ सुरू केला.

व्यावसायासाठी आई-वडिलाकडून दोन लाख रूपये आणण्यासाठी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com