मराठवाडा मुक्तीदिनी कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्ग जाहीर करा - आ. काळे

आ. आशुतोष काळे
आ. आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शिर्डीला (Shirdi) येणार्‍या साईभक्तांचा (Sai devotees) वेळ आणि पैसा वाचला जावा व कोपरगाव तालुक्याच्या (Kopargav Taluka) पूर्व भागाचा आर्थिकदृष्ट्या विकास होण्यासाठी मराठवाडा मुक्तीदिनाच्या मुहूर्तावर कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्ग (Kopargaon-Rotegaon railway line) जाहीर करावा, अशी मागणी आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कोपरगाव विधानसभ मतदार संघातील (Kopargaon Assembly constituency) रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांना कोपरगाव (Kopargav) येथून औरंगाबाद-नांदेड (Aurangabad-Nanded) येथे जाण्यासाठी मनमाड (Manmad) येथे जावे लागते. या प्रवाशांना कोपरगाव-रोटेगाव रेल्वेमार्ग (Kopargaon-Rotegaon railway line) झाल्यास सोयीचे होणार असून कोपरगाव-मनमाड-औरंगाबाद या मार्गावरील जास्तीचे एकूण 94 किलोमीटर अंतर कमी होणार आहे. त्यामुळे कोपरगाववरून नांदेड-औरंगाबाद (Kopargaon to Nanded-Aurangabad) येथे जाणारे व औरंगाबाद व नांदेड वरून कोपरगाव-शिर्डीला येणार्‍या रेल्वे प्रवाशांचे आर्थिक हित साधले जाऊन त्यांचा वेळ देखील वाचणार आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांची अनेक दिवसांची कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्गाची मागणी आहे. हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास कोपरगाव तालुक्यातील तसेच मराठवाड्याच्या सीमेवरील वैजापूर तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांना या रेल्वेमार्गाचा फायदा होऊन येथील नागरिकांच्या आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होणार आहे. या मार्गावरच उक्कडगाव रेल्वे स्टेशन प्रस्तावित असून या रेल्वे स्टेशनमुळे परिसरातील दळणवळण वाढून स्थानिक बेरोजगारांचे रोजीरोटीचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.

17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीदिन असून त्या दिवशी कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्ग जाहीर करून मराठवाडा व कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांना मुक्तिदिनाची भेट द्यावी. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे-नाशिक-औरंगाबाद (Mumbai-Pune-Nashik-Aurangabad) असा औद्योगिक तारांकित चौकोन तयार होईल. औरंगाबादवरून मुंबईला जाणार्‍या रेल्वेगाड्या कोपरगाववरून शिर्डीकडे (Shirdi) वळवून अतिरिक्त कनेक्टीव्हिटी देता येईल त्यामुळे कोपरगाव या चारही महानगरांच्या मध्यावर येऊन कोपरगाव मतदार संघ व परिसराचा विकास साधला जावून कोपरगावच्या बाजापेठेला चालना मिळणार आहे.तसेच मराठवाडा व दक्षिणेकडील राज्यातून शिर्डीला (Shirdi) येणार्‍या भाविकांची सोय होणार आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तीदिनी कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्ग जाहीर करावा, असे आ.आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com