मराठीत पाऊन लाख विद्यार्थी नापास

महाराष्ट्राच्या मराठीतच मराठीची ऐशीतैशी
मराठीत पाऊन लाख विद्यार्थी नापास

संगमनेर|वार्ताहर|Sangmner

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठीत सुमारे पाऊण लाख विद्यार्थी नापास झाल्याचे चित्र समोर आले आहे. मातृभाषेतच विद्यार्थी नापास होत असल्याने मराठी विषयाचे अध्यापन करणार्‍या शिक्षकांसमोर नव्याने प्रश्न निर्माण होणार आहेत.

मागील आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर झाला. राज्यात दहावीला एकूण 15 लाख 75 हजार 103 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाली होते. त्यापैकी 15 लाख 1 हजार 105 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मराठी माध्यमात शिकणार्‍या आणि मराठी प्रथम भाषा म्हणून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 12 लाख 30 हजार 814 इतकी आहे.

यापैकी 11 लाख 78 हजार 781 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम भाषा असलेल्या मराठीत 52 हजार 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर द्वितीय व तृतीय भाषा म्हणून मराठी विषय घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख 84 हजार 771 इतकी आहे.सर्व विद्यार्थी मराठी माध्यमाच्या व्यतिरिक्त असणार्‍या माध्यमातील आहेत.

यातील सर्वाधिक विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील आहेत, मात्र उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख 68 हजार सत्तावीस इतकी आहे. यात 16724 विद्यार्थी नापास झाला आहेत. मराठी हिंदी, मराठी संस्कृत, मराठी अरबी, मराठी पर्शियन, मराठी सिंधी, मराठी बंगाली असे जोड विषय घेऊन परीक्षा दिल्यानंतर तेथे 4420 विद्यार्थी नापास झाले आहेत. मराठी विषयात नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 73 हजार 197 इतकी आहे.

प्रथम भाषा इंग्रजी घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 13 हजार 175 आहे. इसरो विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील शाळेतील असून परीक्षेत बसलेला एकूण विद्यार्थ्यांपैकी 307511 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजे अवघे 5658 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. मात्र मराठी भाषा प्रथम असलेल्या विद्यार्थ्यांचे अनुत्तीर्णतेचे प्रमाण इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या प्रथम भाषेपेक्षा दहापट अधिक आहे.

द्वितीय व तृतीय इंग्रजी भाषा घेऊन प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 13 लाख 75 हजार 393 विद्यार्थ्यांपैकी 13 ला 599 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. येथे 74 हजार 794 विद्यार्थी नापास झाले आहेत. इंग्रजीत एकूण नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 80 हजार 452 इतकी आहे. म्हणजे मातृभाषेत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांच्या जवळ जाणारी ती संख्या आहे. मराठी इतकेच इंग्रजी ही विद्यार्थ्यांना कठीण जात असल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे.

गणित या विषयासाठी 16 लाख 1258 विद्यार्थी परिषद झाली होती त्यापैकी 15 ला 1789 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गणितात नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 71 हजार 769 इतकी आहे. महाराष्ट्राच्या मातृभाषेत विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 5 टक्के असले, तरी या विद्यार्थ्यांना मातृभाषाच येत नसेल, तर इतर विषयाचे आकलन होण्यास कठीण आहे.

त्यामुळे दहावीत जाऊन मातृभाषाच येत नाही असे चित्र समोर आले आहे. राज्यात सिंधी बंगाली, तामिळी, फ्रेंच, विज्ञान व तंत्रज्ञान, अर्थ मॅटिक, कृषी, माध्यम व मनोरंजन, इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, मराठी सिंधी, मराठी बंगाली, हिंदी कन्नड, हिंदी बंगाली, हिदी गुजराती या विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

साधारणपणे मराठी विषयात 75 हजार विद्यार्थी नापास होत असतील, तर त्या विद्यार्थ्यांना स्वभाषेची आकलन नाही. त्यामुळे माध्यम भाषाच येत नसेल तर त्या भाषेतील इतर विषय विद्यार्थ्यांना आकलन होणे कठीण आहे. मराठीत नापास झालेली विद्यार्थ्यांच्या संख्या लक्षात घेता, इतर विषयात उत्तीर्ण होणे देखील कठीण आहे. त्यामुळे मातृभाषेची गुणवत्ता उंचावण्यासाठी काम करावे लागणार आहे. त्यात तोंडी परीक्षेचे गुण आल्यामुळे विद्यार्थी संख्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढले आहेत. ते मार्क नसते तर मातृभाषेत आणखी विद्यार्थी नापास झालेले पहावयास मिळाले असते. असे मातृभाषा शिकविणार्‍या एका शिक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com