शिर्डी : डॉ. हेडगेवार नगरमध्ये गटारीचे पाणी थेट घरात; दुर्गंधीने नागरिक वैतागले

शिर्डी : डॉ. हेडगेवार नगरमध्ये गटारीचे पाणी थेट घरात; दुर्गंधीने नागरिक वैतागले

शिर्डी | प्रतिनिधी

शहरातील डॉ. हेडगेवार नगरमध्ये गेल्या १६ दिवसापासून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असून सांडपाणी तसेच पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या भूमिका गटारीचे पाईप छोटे असल्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या घरात गटारीतील सांडपाणी जाऊन दुर्गंधी निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिका प्रशासनाने जलद गतीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

शिर्डी शहरात गेल्या १६ दिवसापासून सातत्याने जोरदार पाऊस होत असल्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले असून सांडपाणी वाहून नेणारी भूमिगत गटारीच्या पाईपांची रुंदी छोटी असल्यामुळे सांडपाणी चेंबरच्या बाहेर येऊन नागरिकांच्या घरात जात असल्यामुळे डॉ. हेडगेवार नगर परिसरात राहणारे रमेश मुळे, अविनाश सोनवणे, दिगंबर वाडेकर यांच्यासह अनेक नागरिकांच्या घरात हे ड्रेनजचे पाणी गेल्याने नागरिक बेहाल झाले आहे.

तीन आठवड्यापासून पावसाचे पाणी आणि दुर्गंधीयुक्त ड्रेनेजचे पाणी घरात येत असुन यावर नगरपंचायतकडून काहीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याची नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच या परिसराततील रमेश बिडवे, सोमनाथ पाठक, दादा वामन, नितीन वाघ यांच्या तळमजल्यात व नारायण बरदे यांच्या घरासमोर १६ दिवसापासून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. हे पाणी बाहेर काढण्यासाठी दमछाक होत आहे.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन नागरिकांची होणारी गैरसोय पाहणे गरजेचे होते. परंतु मुख्याधिकारी अद्याप या ठिकाणी आलेच नाही असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. शहरात पावसाच्याा पाण्यामुळे विविध साथीचे आजार मोठ्या प्रमाणात फैलावत असून नगरपालिका प्रशासनाने तात्काळ जंतुनाशक फवारणी करावी. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे निर्माण होणारी ही समस्या कायमस्वरूपी दूर करून प्रशासनाने नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com