मराठा समाजाने शेतीसोबत व्यवसाय सुरु करणे गरजेचे - जाधव

मराठा समाजाने शेतीसोबत व्यवसाय सुरु करणे गरजेचे - जाधव

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मराठा समाज बहुउद्देशीय विकास सेवा प्रतिष्ठान हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या ‘लोकसहभागातून लोकांचा विकास’ या मंत्राचा उपयोग मराठा समाजाच्या सहभागातून सर्व मराठा समाजाचा विकास याकरिता कार्य करीत आहे. त्यासाठी मराठा समाजातील सर्व स्तरातील समाज बांधवांनी मराठा प्रतिष्ठानच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विलासराव जाधव यांनी केले.

श्रीरामपूर येथील शिवबा हॉल येथे मराठा समाज प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा श्री. जाधव यांचे अध्यक्षखाली संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन देविदास चव्हाण व ज्ञानेश्वर मोरगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागवतराव लासुरे, उपाध्यक्ष उद्योजक किशोर निर्मळ, मराठा वधू-वर मंडळाचे अध्यक्ष पत्रकार सुरेश कांगुणे, सचिव रावसाहेब तोडमल, शहाजी चेडे, लक्ष्मीकांत शिंदे, संजय टेकाळे, राजेंद्र मोरगे, विठ्ठलराव पवार, रमेश नवले, युवा प्रतिष्ठानचे समितीचे अध्यक्ष अमोल जैत यांच्यासह अनेक मान्यवर व मराठा समाजबांधव उपस्थित होते.

श्री. जाधव पुढे म्हणाले की, मराठा समाजाचे बाजारपेठेतील अस्तित्व जवळजवळ संपत चालले आहे. त्याकरिता आपल्याला मराठा समाजाचे व्यापारी समाज म्हणून पुन्हा अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी मराठा प्रतिष्ठान प्रयत्न करीत आहे. त्याकरिता शेतीसोबत एक व्यवसाय प्रत्येकाने सुरू करणे गरजेचे आहे. फक्त शेतीवर व्यवसायावर अवलंबून राहिल्याने अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. समाजातील प्रत्येक घटकाची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीबरोबर एक व्यवसाय सुरू करून सर्व समाजाने एकत्रितपणे येणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजातील आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या हुशार मुला-मुलींसाठी एज्युकेशन फंड उभारून एज्युकेशन हबची उभारणी करणे त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना आजारासाठी आर्थिक मदतीसाठी मेडिकल फंडाच्या माध्यमातून हातभार लावण्याचा मनोदय मराठा प्रतिष्ठानचा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. लासुरे यांनी मराठा वधू वर मंडळ, मराठा प्रतिष्ठान, मराठा प्रतिष्ठान युवा समिती, महिला समिती, अर्थक्रांती ग्रुप आदींची माहिती दिली. माजी नगरसेवक मनोज लबडे व राजेंद्र आदिक यांच्या सहकार्याने मिळालेल्या जागेत मराठा प्रतिष्ठान भवनचे बांधकाम सुरू असल्याचे लासुरे यांनी सांगितले. उद्योजक किशोर निर्मळ यांनी, मराठा प्रतिष्ठानचे कार्य वाढले असून प्रत्येकाने व्यवसायातही सहभागी होऊन सक्षम बनले पाहिजे. त्याकरिता येणार्‍या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी मराठा प्रतिष्ठान कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मराठा प्रतिष्ठान वैचारिक देवाण-घेवाण आणि समाजाला दिशा देण्यासाठी बैठका घेवून ग्राम समित्यांची स्थापना करीत आहे. गाव पातळीवर प्रत्येक गावात मराठा प्रतिष्ठानसाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी युवा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष स्वप्निल लांडे, बाबासाहेब मोरगे, पत्रकार नवनाथ कुताळ, प्रदीप आहेर, विजय ढोकचौळे, देविदास चव्हाण, अजय बोर्डे, राजेंद्र मोरगे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आकाश मोरगे तर आभार तुषार पवार यांनी मानले.

याप्रसंगी सर्वश्री अरुण लबडे, भाऊसाहेब चौधरी, सुनील गलांडे, अमोल बोंबले, विजय मोरगे, ऋषिकेश बोर्डे, राजेंद्र पठाडे, दत्तात्रय जाधव, सतीश लबडे, योगेश जाधव, अमोल सुर्वे, भास्कर इंगळे, सचिन खर्डे, संदीप काळे, सोपान मोरगे, पराग भोसले, प्रशांत ठोंबरे यांच्यासह मराठा समाजबांधव उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com