सर्वपक्षीय पुढार्‍यांना गावबंदी

हडस पिंपळगाव येथील मराठा समाजाचा एकमुखी निर्णय
सर्वपक्षीय पुढार्‍यांना गावबंदी

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

मराठा समाजास जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांना गावात येण्यास बंदी करण्याचा निर्णय वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव येथील मराठा समाजाने घेतला आहे. तसा फलक गावात येणार्‍या मुख्य मार्गावर लावला आहे.

सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात मराठा समाजाचे आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला 24 ऑक्टोबर ही डेडलाईन दिली आहे. पण आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत पुढार्‍यांना गावबंदीचा निर्णय घेत आरक्षणाचा विषय चालू ठेवण्याचा इशारा दिला.

तालुक्यातील हडस पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गावात दि.16 रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदीर परिसरात एकत्र येत सर्वच पक्षाच्या नेत्यांना गावात येण्यास मज्जाव केला आहे, तसेच गावातील तरुणानी सोशल मिडियावरहृ कोणत्याही पक्षाचे समर्थन करु नाही असाही आवाहन सर्वांना केले आहे.

याबाबत दि.17 आक्टोंबर रोजी वैजापुरचे तहसिलदार व पोलिस ठाणे येथे निवेदन देण्यात येणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com