Maratha reservation : शिवसंग्रामचे धरणे आंदोलन

ठरावाच्या अंमलबजावणीची मागणी
Maratha reservation : शिवसंग्रामचे धरणे आंदोलन

अहमदनगर | प्रतिनिधी

मराठा आरक्षणप्रश्न (Maratha reservation) राज्य सरकार (State Govt) ठाम भुमिका आणि निर्णय घेत नसल्याने शिवसंग्राम संघटनेने (Shivsangram Sanghatana) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Office) धरणे आंदोलन (dharana aandolan) सुरू केले आहे.

शिवसंग्राम (Shivsangram), मराठा क्रांती संघर्ष मोर्चा (Maratha Kranti Morcha) आणि अन्य मराठा संघटनांच्या (Maratha organization) उपस्थितीत झालेल्या राज्यव्यापी बैठकीत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

Maratha reservation : शिवसंग्रामचे धरणे आंदोलन
आयटी पार्कच्या नावे आमदारांकडून गंडा

जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलनात जिल्हा अध्यक्ष सुरेश शेटे पाटील, नवनाथ इसारवाडे, संदीप ब्राह्मणे, कैलास साळवे, ज्ञानदेव म्हस्के, शिवाजी ताके, सुभाष आवटी, अशोक नवले, ऋषिकेश म्हस्के आदी पदाधिकारी सहभागी झाले. मराठा समाजाचे आरक्षण 5 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर केंद्र सरकारने (Central Govt) संसदेच्या अधिवेशनामध्ये (parliament monsoon session 2021) 102 व्या घटनादुरुस्ती करून 127 वी घटना दुरुस्ती (127th Amendment Bill) केली आणि राज्यांना आरक्षण देण्याचे व मागास ठरवण्याचे अधिकार दिले आहेत.

राज्य सरकार मात्र कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही. मराठा आरक्षण रद्द (Maratha reservation canceled) होण्यासारखा एवढा मोठा निर्णय झाला, ज्याचा मराठा समाजावर (Maratha community) मोठा परिणाम होत आहे. राज्य सरकार मात्र कुठलीही ठाम भूमिका घेत नाही. म्हणून पुढील काळामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने जर या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे संघटनेने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com