संभाजीराजे छत्रपती उद्या नगर जिल्हा दौऱ्यावर, 'कोपर्डी' पुन्हा चर्चेत

मराठा आरक्षण आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याची शक्यता
संभाजीराजे छत्रपती उद्या नगर जिल्हा दौऱ्यावर, 'कोपर्डी' पुन्हा चर्चेत

चांदा | वार्ताहर

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला पेटला आहे. आरक्षणाच्या या लढाईत खासदार संभाजीराजे छत्रपती सक्रिय झाले आहेत. सध्या संभाजीराजे हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात रणनिती ठरविण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे उद्या शनिवार दिनांक १२ रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याच्या भव्य स्वागताची तयारी जिल्हातील तरुणांनी चालविली असून छत्रपती संभाजीराजेंसोबत जिल्ह्यातील मराठा समाज आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मराठा आंदोलनाचे समन्वयक क्रांतीवीर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

संभाजीराजे छत्रपती उद्या नगर जिल्हा दौऱ्यावर, 'कोपर्डी' पुन्हा चर्चेत
शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर 'सिल्व्हर ओक'वर; कोणती रणनीती ठरणार?

मराठा समाजाला आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्या संदर्भात युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रात आंदोलनाची हाक दिली आहे. या संदर्भात संभाजीराजे उद्या दि.१२ रोजी नगर जिल्हयातील कोपर्डी येथे दुपारी दोन वाजता येत असून जिल्हयातील सर्व समन्वयक, मराठा संघटनाचे पदाधिकारी, कोपर्डी ग्रामस्थ, पीडितेच्या कुटुंबाशी चर्चा करणार आहेत व तेथून आंदोलनाचे रणशिंग फुकणार आहेत.

त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणाऱ्या गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन तेथेही भेट देणार आहेत. कोपर्डीभेटी दरम्यान त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हयातील सर्व समन्वयक, मराठा संघटनाचे पदाधिकारी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समन्वयक अशोक चव्हाण यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com