मराठा आरक्षण रद्द करण्याचा न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे - आमदार बबनराव पाचपुते

मराठा आरक्षण रद्द करण्याचा न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे - आमदार बबनराव पाचपुते

श्रीगोंदा |ता. प्रतिनिधी| Shrigonda

मराठा समाजास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आरक्षण दिले होते. हे आरक्षण न्यायालयाने मान्य केलेले नाही हे दुर्दैवी आहे. यामध्ये सध्याच्या महाविकास आघाडीच्या राज्य शासनाचीही मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची इच्छा होती.

परंतु इच्छाशक्ती कमी पडले. राज्य शासन याबाबत न्यायालयामध्ये बाजू मांडण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. हा निर्णय अतिशय दुर्दैवी असून तसेच मराठा तरुणांना हताश आणि निराश करणारा आहे. मराठा समाजातील तरुणांसाठी सर्वसमावेशक रणनीती आखावी लागेल.

तसेच मराठा तरुणांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासनाने तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन योग्य ते उपाय योजना करावी ही विनंती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com