मराठा वधू-वर सूचक मंडळाच्या अध्यक्षपदी सुरेश कांगुणे

मराठा वधू-वर सूचक मंडळाच्या अध्यक्षपदी सुरेश कांगुणे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - येथील मराठा समाज बहुउद्देशिय विकास सेवा प्रतिष्ठान संचलित मराठा वधू-वर सूचक मंडळाच्या (maratha vadhu var suchak mandal) अध्यक्षपदी प्रतिष्ठानचे विश्‍वस्त सुरेश कांगुणे (Suresh Kangune) यांची एकमताने निवड करण्यात आली. शिवबा हॉल येथे मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विलासराव जाधव, अध्यक्ष भागवत लासुरे, उपाध्यक्षा सिमाताई जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. Maratha Matrimony

मराठा वधू-वर सूचक मंडळ गेल्या पाच वर्षापासून कार्यरत असून आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त वधू-वरांचे विवाह जुळले आहेत. तर विविध क्षेत्रातील सुमारे दोन हजार वधू-वरांचे बायोडाटा उपलब्ध आहेत. वधू-वर मंडळाचे अध्यक्ष श्री. लासुरे यांची मराठा प्रतिष्ठानचच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने नूतन अध्यक्ष म्हणून श्री. कांगुणे यांची निवड करण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारीणी निवडण्यात आली. त्यात कार्याध्यक्ष शहाजी चेडे, उपाध्यक्ष अजय बोर्डे, ऋषिकेश मोरगे, अमोल जैत, सचिव डॉ. अरविंद बडाख, सहसचिव रमेश नवले व स्वप्नील लांडे, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड्.संदीप चोरगे तसेच महिला प्रतिनिधी मयुरा निंबाळकर व लतिका गागरे यांचा समावेश आहे.

याप्रसंगी मराठा प्रतिष्ठानचे विलासराव जाधव, भागवत लासुरे, पत्रकार करण नवले, अर्जुनराव खरात यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले. यावेळी नितीन दांगट, शिवाजी शेजुळ, शिवाजीराव मुठे, बापुसाहेब करंडे, जनार्दन घोगरे, संतोष खर्डे, राजेंद्र टेकाळे, बाबासाहेब पवार, युवा ग्रुप अध्यक्ष संतोष ठोकळ, प्रतिष्ठानचे सचिव रावसाहेब तोडमल, लक्ष्मीकांत शिंदे, अविनाश पटारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र मोरगे यांनी केले तर डॉ. अरविंद बडाख यांनी आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com