उद्योजकांच्या प्रश्नांसाठी पाठीशी राहणार - मंत्री थोरात

एमआयडीसीतील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, आमी संघटनेनच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक
उद्योजकांच्या प्रश्नांसाठी पाठीशी राहणार - मंत्री थोरात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

देशाची अर्थव्यवस्था (economy of the country) विकसित व्हायची असेल तर त्यासाठी औद्योगिकीकरण महत्त्वाचे (Industrialization is important) आहे. उद्योग हा त्याचा आत्मा आहे. नगर शहरातील उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम निश्चितपणे मी करेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी केले आहे.

शहर काँग्रेसच्या (City Congress) पुढाकारातून मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या हॉलमध्ये (Hall of the Maratha Chamber of Commerce) नगर एमआयडीसीतील (Ahmednagar MIDC) मराठा चेंबर ऑफ कॉमर्स तसेच आमी संघटनेचे (AMI organization) लघु व मोठ्या उद्योजकांची बैठक थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, उपाध्यक्ष प्रकाश गांधी, आ. डॉ. सुधीर तांबे, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंतराव गारदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते पाटील, मच्छिंद्र साळुंखे आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विशेष बैठकीमध्ये उद्योजकांनी अनेक प्रश्न ना. थोरात यांच्या समोर मांडले. ग्रामपंचायत आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणा असून एकाच वेळेला दुहेरी कर आकारला जातो. यापैकी एक कर ठेवण्यात यावा अशी मागणी यावेळी उद्योजक यांच्यावतीने करण्यात आली. पाण्याची पाईपलाईन जुनी झाल्याने ती सतत फुटते. त्याचबरोबर नगर-मनमाड रस्त्याच्या विस्तारीकरणाची गरज आहे.

तसेच एमआयडीसी (MIDC) परिसरामध्ये असणारे ट्रक टर्मिनल (Truck terminal) मंजूर झाल्यास त्याची उद्योजकांना मदत होईल, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. ना. थोरात म्हणाले, यातील काही मागण्या राज्य स्तरावरील असल्याने शासन म्हणून त्याचा पाठपुरावा करावा लागेल. त्यासाठी बैठकांचे आयोजन निश्चितपणे केले जाईल. संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांना उद्योजकांच्या मागण्यांसंदर्भात लेखी सूचना करणार असून त्यांचा पाठपुरावा देखील करणार आहे, असे आश्वासन यावेळी ना.थोरात यांनी दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com