मापारी हल्ल्याप्रकरणी काँग्रेसकडून निषेध

मापारी हल्ल्याप्रकरणी काँग्रेसकडून निषेध

सात्रळ |वार्ताहर| Satral

श्रीकांत मापारी यांच्यावर हल्ला करणार्‍या हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन

राहुरी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने कोल्हार-रामपूर येथील तलाठी राहाणे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले, श्रीकांत मापारी यांच्यावर संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे काही अज्ञात हल्लेखोरांनी राजकीय द्वेषातून जीवघेणा हल्ला झाला. या हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर बाळासाहेब आढाव, संजय भोसले, बापूसाहेब दिघे, राजेंद्र सरोदे, राजेंद्र बोरूडे, मच्छिंद्र मोरे, अनुसंगम शिंदे, रखमाजी क्षीरसागर, राजेंद्र वाघमारे, दीपक कदम, विजय सिनारे, महिपती शिरसाठ, आल्फोन्स भोसले आदींच्या सह्या आहेत.

निवेदनाची दखल न घेतल्यास बाळासाहेब चव्हाण, पंढूतात्या पवार, बाळासाहेब आढाव यांच्या नेतृत्वाताखाली आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रदेश समन्वयक संजय भोसले यांनी दिला आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com