अहमदनगर : लसीकरणासाठी मनपाने 20 केंद्र वाढवले

अहमदनगर : लसीकरणासाठी मनपाने 20 केंद्र वाढवले

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोना लसीकरणादरम्यान आरोग्य केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने आरोग्य केंद्रांतर्गत आणखी 20 उपकेंद्र वाढविली आहे. यामुळे लसीकरणासाठी होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांनाही लसीकरण सुलभ होणार आहे. या उपकेंद्राची व्यवस्था मंगलकार्यालयात करण्यात आली आहे.

लाभार्थी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचे निर्देश राज्य सरकारने दिल्यानंतर महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी नगर शहरात 20 ठिकाणी करोना लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. पावसाळ्याचे दिवस पाहता लसीकरण मोहिमेत व्यत्य येऊ नये यासाठी हे उपकेंद्र सुरू करण्यात आले असून शनिवारपासून या केंद्रावर लसीकरण सुरू झाले आहे. केंद्रावर होणारी गर्दी आणि आगामी पावसाळा हंगाम विचारात घेता लसीकरण सुलभतेने आणि विना अडथळा सुरू असणे गरजेचे आहे. करोनाची तिसर्‍या लाटेची बाधा होण्यापूर्वीच लसीकरणाला वेग देण्याच्या दृष्टीकोनातून आयुक्त गोरे यांनी नगर शहरातील नागरी आरोग्य केंद्रातंर्गत लसीकरणाची उपकेंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेत तसे आदेशही निर्गमीत केले आहेत. लसीकरण केंद्रासाठी लागणार्‍या टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर, डाटा आपरेटर कर्मचारी महापालिकेच्या वार्षिक ठेकेदारमार्फत पुरविण्यात येणार आहेत. हे साहित्य पुरविण्याची जबाबदारी महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर टाकण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.