मानोरीत तलाठ्यास मारहाण, दोघाविरोधात गुन्हा दाखल

मानोरीत तलाठ्यास मारहाण, दोघाविरोधात गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील मानोरी येथील तलाठ्यास शेतीचा फेरफार उतारा देण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण झाल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मानोरी येथील तलाठी राहुल राजकुमार कराड यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, आरोपी वसंत फ्रान्सिंस आढाव, वैभव फ्रान्सिंस आढाव, दोघे राहणार मानोरी यांनी गुरूवारी दुपारी तलाठी कार्यालयात येऊन गट नंबर 188/अ या गटावरील शर्त खरेदी फेरफार नं. 846 हा मला कमी कर द्या असे म्हणाले असता त्यांना फिर्यादी तलाठी कराड म्हणाले की सदर फेरफार हा मुळात रद्द असल्याने कमी करण्याचा प्रश्न उदभवत नाही.

तसेच तशी ऑनलाईन ई फेरफार प्राणाली मध्ये सुविधा देखील उपलब्ध नाही, असे समजावुन सांगत असताना त्याचा राग येवुन आरोपी यांनी शिवीगाळ करून गंचाडी धरून मारहाण केली तसेच टेबल वरील लॅपटॉप व प्रिटर यांचे देखील नुकसान केले. तसेच पोलिसात तक्रार केली तर तुमच्या विरूध्द अ‍ॅट्रोसिटी दाखल करील अशी धमकी देखील दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी राहुरी पोलिसात आरोपी वसंत फ्रान्सिंस आढाव वैभव वंसत आढाव यांच्या विरोधात भा.दं.वि कलम-353, 332, 504, 506, 188, 269, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील हे पुढील तपास करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com