मानोरी सोसायटीच्या अध्यक्षपदी शरद पोटे तर उपाध्यक्षपदी रंजना आढाव

मानोरी सोसायटीच्या अध्यक्षपदी शरद पोटे तर उपाध्यक्षपदी रंजना आढाव

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील मानोरी सोसायटीच्या अध्यक्षपदी शरद पोटे यांची तर उपाध्यक्षपदी रंजना बाळकृष्ण आढाव यांची निवड करण्यात आली आहे.

परिवर्तन मंडळ व जनसेवा मंडळ यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत परिवर्तन मंडळाने सात जागा पटकावत विजय मिळविला. तर जनसेवेला सहा जागा मिळाल्या. अवघ्या एका जागेचे बहुमत परिवर्तन मंडळाकडे असल्याने अध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार? याची उत्सुकता निर्माण झाली होती.

निवडणूक अधिकारी एन.डी.खंडेराय यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. संस्थेचे सचिव काशिनाथ काळे यांनी सहाय्य केले. अध्यक्षपदासाठी परिवर्तन मंडाळाचे शरद पोटे यांनी तर जनसेवा मंडळाचे दत्तात्रय आढाव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.तर उपाध्यक्षपदासाठी परिवर्तन मंडळाच्या रंजना आढाव यांनी तर जनसेवा मंडळाच्या शिवराम काळे यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर निर्णायक अधिकारी खंडेराय यांनी गुप्त मतदान घेण्याचा निर्णय घेतला. या मतदान प्रक्रियेत संचालक शरद पोटे, भास्कर भिंगारे, देविदास वाघ, गोरक्षनाथ खुळे, साहेबराव बाचकर, रायभान आढाव, रंजनाबाई आढाव, दत्तात्रय आढाव, भागवत थोरात, राजेंद्र पोटे, सुनीता चुळभरे, शिवराम काळे, रामदास सोडनर आदी संचालकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.

यामध्ये परिवर्तन मंडळाच्या उमेदवाराला सात तर जनसेवा मंडळाच्या उमेदवाराला सहा मते पडली. त्यानुसार अध्यक्षपदी पोटे व उपाध्यक्षपदी आढाव यांचा एक मताने विजय झाल्याने त्यांची निवड घोषित केली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बाळूकाका वाघ, उत्तमराव आढाव, दगडू पोटे, भाऊराव वाघ, भाऊराव आढाव, निवृत्ती आढाव, कचरू आढाव, उत्तम खुळे, साहेबराव तोडमल, पोपट पोटे, मनोज खुळे, शामराव आढाव, के.बी.शेख, सुनील पोटे, नानासाहेब तनपुरे, सुभाष वाघ, वैभव पवार, इब्राहिम पठाण, छगन सय्यद, पापाभाई शेख, नामदेव पोटे, संजय डोंगरे, बाळासाहेब मिखाईल आढाव, कुशाबापू भिंगारे, जगबाची बाचकर, अभिषेक आढाव, अर्जुन पोटे, गोरख बाचकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.