मानोरी येथे दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक

दोन जण जबर जखमी
मानोरी येथे दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक

आरडगांव |वार्ताहर| Aradgav

राहुरी-मांजरी रस्त्यावर मानोरी (ठुबे वस्ती) येथे समोरासमोर दोन मोटारसायकलच्या धडकेत महिला व पुरुष जबर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राहुरी-मांजरी रस्त्यावर संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असुन, मयुर आशोक कुंढरे (वरखेड ता. नेवासा) हे मच्छिमार व्यवसाय करुन राहुरी येथून घराच्या दिशेने जात आसताना मानोरी (ठुबे वस्ती) येथे मिरा बाचकर (वाटापुर ता. नेवासा) येथून आपल्या भावाच्या मुला सोबत जात असतांना समोरासमोर मोटारसायकल धडकेत हि घटना घडली असल्याचे समजते.

रुग्णवाहिकेला तातडीने फोन करून जखमींना नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.